सोलापुरात रोबोट करतोय कोरोना बाधितांची सेवा

0

 

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे प्रकार काही ठिकाणी पाहायला मिळाले आहेत. यावर सोलापुरातील रेल्वे हॉस्पिटलने अनोखा उपाय शोधला आहे. रुग्णांशी थेट संपर्क येऊ नये यासाठी रोबोची निर्मिती करण्यात आली आहे. सोलापुरातील डॉ. कोटणीस स्मारक रेल्वे हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहे. जिथे रुग्णांवर उपचार केले जात आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा रुग्णांशी थेट संपर्क टाळण्यासाठी अनोखा रोबो तयार करण्यात आला आहे. रेल्वेच्या मॅकॅनिकल डिव्हिजनतर्फे या रोबोची निर्मिती करण्यात आली आहे.या रोबोमध्ये रुग्णांशी बोलण्यासाठी, त्यांना पाहून संपर्क करण्यासाठी टू व्हे व्हिडिओ कॉलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

रोबोच्या समोर ट्रे आहे ज्यात औषधे, जेवण यासारख्या गरजेच्या गोष्टी देण्यात येतात. जेणेकरुन वैद्यकीय कर्माचाऱ्यांचा कमीत कमी संपर्क रुग्णांशी येऊ शकेल.विशेष म्हणजे अवघ्या तीन दिवसात या रोबोची निर्मिती करण्यात आली आहे. सोलापुरातल्या रेल्वेच्या मेकॅनिकल विभागातच याची निर्मिती करण्यात आली आहे. या अनोख्या रोबोला 'सारथी' असे नाव देण्यात आले आहे.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)