पंढरपूर येथील दामाजी मंदीरात श्री संत दामाजीपंत यांची पुण्यतिथी सोहळा संपन्न

0

पंढरपूर : पंढरपूर येथील दामाजी मंदीरात श्री संत दामाजीपंत यांची पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला. सध्या कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे मंदीरात सकाळी 8-30 वा महाअभिषेक सौ.वैशाली व श्री.दत्ता पाटील यांचे हस्ते करण्यात आला. रितीरिवाजाप्रमाणे सर्व पुजा महानैवैद्य दाखविण्यात आला. तर सायं. 7 वा फुले टाकण्याचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी पांडुरंगाची व श्रीसंत दामाजीपंत यांची आरती करण्यात आली. यावेळी मंदीराचे भटजी राजाभाऊ कुलकर्णी यांनी सर्व सोपस्कार पार पाडले. मंदीराचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे,व्यवस्थापक आनंद जावळे व सदस्य हजारे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी सोमनाथ कस्तुरे, सचिन माने,संतोष साळुंखे इ. हजर होते. 
   श्री संत दामाजीपंत हे विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. वारकरी सांपदायात त्यांना मानाचे स्थान आहे. दामाजीपंतानी दुर्गादेवीच्या दुष्काळात लोकांना खायला अन्न मिळत नव्हते त्यावेळेस दामाजीपंत यांनी सर्वांना मदतीचा हात देत होते. प्रसंगाचे गांभीर्य जाणून सरकारी धान्याचं कोठार लोकांना लुटायला विठु महाराला सांगितले व पंताच्या आग्रहावरून तशी दवंडी देऊन लोकांना गंगा व यमुना नावाची धान्याची कोठारे लुटली यावेळी दामाजीपंत तत्कालीन तहसीलदार होते. ही खबर बादशहाला मिळतात पंतांना बिदरला नेण्यासाठी शिपाई आले होते. पण दामाजीपंताच्या आग्रहाखातर पहिल्यांदा विठ्ठल दर्शन घेऊन ते बिदरला निघाले. पण त्यावेळेस पांडुरंगाने विठू महाराचे रूप घेऊन बादशहाच्या दरबारात लुटलेल्या धान्याचे दाम देण्यासाठी आलो आहे असे सांगून मोहराचा पाऊस पाडला. ही गोष्ट दामाजीपंताला माहीत नव्हती. पण दरबारात गेल्यानंतर बादशहा म्हणाले तुमचा विठू महार येऊन धान्याचे दाम देऊन गेला.त्यावेळेस दामाजीपंत समजले विठु महार नसुन खुद्द भगवंतानेच हे दाम भरले आहे. अशी भगवंताची अपार लिला पाहून बादशहाने सुध्दा दामाजीपंताना सन्मानाने वागविले. 
अशा दामाजीपंताचे मंदीर पंढरपूर येथे संभाजी चौकात आहे. कै. किसनलाल काकाणी यांनी अपार कष्ट सोसून या मंदीराची उभारणी केली. सध्या अध्यक्ष विष्णुपंत आवताडे, व्यवस्थापक आनंद जावळे हे येथील मठातील सोयी सुविधा उपलब्ध करून देत असतात. 
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)