टेक : कोरोना व्हायरस चे दिवसेंदिवस रुग्ण भारत तसेच महाराष्ट्रात वाढत आहेत. तसेच दिवसेंदिवस सोशल मीडियावर करोना व्हायरसबाबत पसरणाऱ्या अफवा चे प्रमाण पण वाढत आहे. संचार बंदी मुळे बहुतांश नागरिक हे घरी आहेत. त्यामुळे इंटरनेट हा एकमेव एंटरटेनमेंट चा पर्याय आहे. पण काही लोकांच्या चुकीच्या वापरामुळे कोरोना बद्दल विविध अफवा पसरत आहेत आणि रोज यात वाढच होताना दिसतंय.
सोशल मीडिया वरील या अफवा रोखण्यासाठी लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp ने मोठा निर्णय घेतलाय. WhatsApp ने मेसेज फॉरवर्ड करण्याला नवीन मर्यादा घातली आहे.
व्हॉट्सअॅपवर आतापर्यंत एखादा मेसेज एकावेळी पाच जणांना फॉरवर्ड करता येत होता. पण आता कंपनीने यामध्ये बदल केला आहे. सतत फॉरवर्ड होणारे मेसेजेस रोखण्यासाठी नवीन मर्यादा कंपनीने घातली आहे. यानुसार, एखादा मेसेज तुम्ही एकदा पाच जणांना फॉरवर्ड करु शकाल, पण त्यानंतर मात्र जर तोच मेसेज तुम्हाला पुन्हा फॉरवर्ड करायचा असेल तर तुम्ही केवळ एकाच व्यक्तीला तो फॉरवर्ड करु शकणार आहात. पुढील अपडेटपासून मेसेज फॉरवर्डची ही नवी मर्यादा लागू होण्याची शक्यता आहे.

