कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी खाजगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा सहभाग महत्वाचा आहे.- प्रांतधिकारी सचिन ढोले

0
         कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना  तसेच बाह्यरुग्ण तपासणी बाबत  खाजगी हॉस्पिटलच्या वतीने देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधा, हॉस्पिटलमध्ये करण्यात येत असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नवीन भक्त निवास पंढरपूर, येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप ढेले, उपजिल्हा  रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे, न.पाचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर तसेच शहरातील सर्व खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर उपस्थित होते.
        यावेळी प्रांतधिकारी सचिन ढोले बोलताना म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी  तसेच उपचाराठी डॉक्टर, परिचारिका चांगल्याप्रकारे  सेवा देत आहेत. तसेच शहरात नगरपालिकेने  ठरवून दिलेल्या जागेवरती कम्युनिटी  क्लिनिक सुरु करावेत. या ठिकाणी खाजगी डॉक्टर व कर्मचारी वैद्यकीय सेवा देतील .त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय प्रशासनाच्या सूचनेनुसार आवश्यकता भासल्यास  पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे कोविड-19 हॉस्पिटलचे  रुपांतर करण्यात येईल असेही  प्रांतधिकारी  ढोले यांनी सांगितले. रुग्णालयांनी त्यांच्याकडे असणाऱ्या रुग्णवाहिका सुसज्ज ठेवाव्यात तसेच नागकरीकांनी विनाकारण  घराबाहेर पडू नये असे आवाहनही प्रांतधिकारी ढोले यांनी यावेळी केले.
         यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले  बोलताना म्हणाले,  कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी महात्मा ज्योतिराव फुले अंतर्गत असणाऱ्या तसेच इतर हॉस्पिटलने आपली व्हॅटिलेटर ची सुविधा सुसज्ज ठेवावी. पंढरपूर शहरात सुरु करण्यात येणारी कम्युनिटी क्लिनिक साठी आवश्यकतेनुसार वैद्यकीय सुविधा देण्यात येतील.  
          कोरोना विषाणूचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी  शहरातील सर्व डॉक्टर्स  प्रशासनास सहकार्य करतील असे ही  आय.एम.ए  चे अध्यक्ष डॉ.पंकज गायकवाड यांनी सांगितले
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)