सोलापुरात कोरोना चा कोणताही रुग्ण नाही.अफवांवर विश्वास ठेवू नये.- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

0

सोलापूर : सोलापुरात कोरोना चा रुग्ण आढळल्याची बातमी ही चुकीची असून सोलापुरात असा कोणताही रुग्ण नसल्याची स्पष्टोक्ती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकारांना बोलताना दिली.सोलापुरातून तो गेलेला मजूर ग्वाल्हेरमध्ये संसर्गित झालेला होता अशी माहिती आहे.परंतु त्याचा सोलापुरातील इतर लोकांशी संपर्क आला आहे का याची प्रशासन खातरजमा करत आहे सोलापूरकरांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये .प्रशासनाने सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे आणि लॉकडाऊन चे तंतोतंत पालन करावे असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

      सोलापुरातून ग्वाल्हेरला प्रवास करणारा द्राक्ष नेटिंग मजूर कोरोना पॉसिटीव्ह असल्याचे निदर्शनात आले.सोलापुरातील मंद्रुप तालुक्यातील एका गावात द्राक्ष नेटिंगसाठी आला होता हा मजूर गावात संपर्कात आलेल्या सर्व ग्रामस्थांची आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू आहे.1 एप्रिल रोजी सोलापुरातुन हा मजूर ग्वाल्हेरला गेला होता. गावी परतल्यावर तपासणी केल्यानंतर कोरोना पोसिटीव्ह असल्याचा आला आहे अहवाल विशेष म्हणजे या रुग्णात कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत.अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)