कोरोणा मुळे 2020 च्या दुसर्या सेमिस्टर चे पेपर हे पुढे ढकलण्यात आले आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे लॉकडाऊन 15 एप्रिल ला संपणार का पुढे ढकलण्यात येणार या गोष्टी मध्ये संभ्रम आहे. आणि विद्यापिठा कडून परिक्षेबद्दल अद्याप तरी काहीही विद्यार्थ्याना किंवा पालकांना सांगण्यात आलेले नाही.
अशा प्रकारे आहे या ई-मेल चा मजकुर.
माननीय महोदया
विषय- परीक्षा घ्यायच्या की नाही. का पास करायचे यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा.
सध्या जगात कोरूना या रोगाने थैमान घातले आहे. आपल्या भारतामध्ये सुद्धा कोरूना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे .सध्या महाराष्ट्रात लॉक डाऊन ची अंमलबजावणी चालू आहे .कोरोना हा रोग कधी आटोक्यात येईल हे सांगता येत नाही .तसेच 2020 मधील सेमिस्टर दुसरी च्या परीक्षा झालेल्या नाहीत .परीक्षेला विद्यार्थ्यांची संख्याही भरपूर आहे .त्यावर कोरोणाचे संकट . दिनांक 14 एप्रिल पर्यंत सर्व कॉलेजला सुट्ट्या दिलेल्या आहेत व परीक्षा ही पुढे ढकलल्या आहेत, परीक्षा घ्यायच्या का नाही घ्यायचा यावर अजून विद्यापीठाने निर्णय दिलेले नाहीत, जर परीक्षा घेतल्या तर परीक्षेसाठी दोन ते तीन महिने लागतात त्यानंतर निकाल लागायला दोन महिने लागतात त्यानंतर ऍडमिशन व्हायला दोन महिने लागतात या सगळ्याचा विचार करता कॉलेजचा कालावधी सहा महिन्याच्या पुढे जातोय.तसेच परीक्षा जर घ्यायच्या जाहीर केल्या तर परिक्षेला येण्या-जाण्यासाठी एसटी सेवा चालू नाहीत ,कलम 144 लागू झालेले आहे त्यामुळे जर बाहेर फिरले तर कारवाई होतीय, जर परीक्षा घेतल्या तर सर्वांनाच त्रास होणार आहे परीक्षा होणार की नाही होणार, पुढच आमच भवितव्य काय, असे अनेक प्रश्न विद्यार्थीच्या मनात आहेत ,गव्हर्मेंट जॉब साठी वयाची अट असते. एखाद्या परिक्षेला भविष्यात विद्यार्थ्यांना फॉर्म भरला तर त्याचे ग्रॅज्युएशन चे वय सहा महिन्याने वाढलेले असणार आहे. त्यामुळे त्याला त्या परीक्षेला त्याचे वय बसणार नाही .अशा अनेक अडचणी उद्भवणार आहेत. त्यामुळे यावर परीक्षा घ्यायच्या की नाही घ्यायच्या की पास करायचे यावर लवकरात लवकर योग्य तो निर्णय जाहीर करावा .
आपलाच
श्री.विजय कदम
छावा क्षात्रवीर विद्यार्थी आघाडी
सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष
तसेच या वेळी बोलताना छावा क्षात्रवीर सेना चे श्री.विजय कदम (छावा क्षात्रवीर विद्यार्थी आघाडी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष) की, मा.उद्धव ठाकरे आमच्या ई-मेल ची लवकरच दखल घेतील. त्याच्या येणार्या प्रतिक्रियेची (उत्तराची) (ई-मेल) ची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.
फक्त कोणत्याही मुलाचे शैक्षणिक वर्ष वाया जावु नये. अशी आमची इच्छा आहे.

