छावा क्षात्रवीर सेना तर्फे मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शी ई-मेल व संपर्क साधत सध्या चालु असलेली पंढरपूर परस्थिती बद्दल माहीती देत लोकांना होणारा त्रास सांगत लोकांच्या काही मागण्या पुर्ण कराव्यात अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना
केली.
अशा प्रकारे आहे या ई-मेल चा मजकुर. या मध्ये गरीब लोकांसाठी काही तरी करावे अशी मागणी छावा क्षात्रवीर सेना तर्फे समाधान दादा सुरवसे छावा क्षात्रवीर सेना संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, व विजय कदम छावा क्षात्रवीर सेना विद्यार्थी आघाडी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष यांनी मुख्यमंत्री साहेबानी केली.
नमस्कार मुख्यमंत्री साहेब,
सध्याच्या कोरोना च्या परस्थिती मुळे काही लोकांना एक टाईमाचे जेवन सुद्धा मिळेना झालय, गोरगरीब जनतेला अन्न धान्य द्या मुंबई पुणे इतर शहरातून गावाकडे जाणार्या लोकांना जेवणाची सोय करावी ,आज कित्येक लोकांना जेवन्यासाठी अन्न मिळत नाही, प्रत्येक गावातून जाताना गावातील सरकारी अधिकार्यांना त्यांच्या जेवनाची सोय करायला लावा ,गावाकडे जाणार्या माणसांसोबत त्यांची लहान लहान मुले आहेत, अक्षरशा दुकाने बंद असल्यामुळे काही गावात साधा बिस्किट पुडा सुद्धा मिळत नाही, त्यांना वेळेवर जेवन मिळत नाही, त्यांच्या साठी लवकरात लवकर काही तरी उपययोजना करावी सध्या मोफत अन्नधान्य सुद्दा आजुन काही ठीकाणी मिळत नाही , महाराष्ट्र सरकारला विनंती.
छावा क्षात्रवीर सेना
आपलाच
श्री.समाधान दादा सुरवसे
(छावा क्षात्रवीर सेना संस्थापक अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य)
श्री.विजय कदम (छावा क्षात्रवीर सेना विद्यार्थी आघाडी
सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष)
तसेच या वेळी बोलताना छावा क्षात्रवीर सेना चे संस्थापक अध्यक्ष समाधान दादा सुरवसे म्हणाले.की, मा.उद्धव ठाकरे आमच्या ई-मेल ची लवकरच दखल घेतील.
त्याच्या येणार्या प्रतिक्रियेची (उत्तराची) (ई-मेल) ची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.

