कोरोणाच्या संकटकाळात प्रभाग क्रं ७ मधील ११०० कष्टकरी गरीब कुटूबांना १० दिवसाचे जिवनावश्यक अन्नधान्य वाटून मोठा दिलासा दिला. आज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती व दिनांक १४ एप्रिल महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त जमलेल्या सर्व वर्गणीतून या मंडळाचे संस्थापक नगरसेवक सुजितकूमार सर्वगोड व त्यांचे सर्व सहकारी यांनी मा.आमदार श्री प्रशांतराव परिचारक यांनी जयंती साधेपणाने साजरी करावी व शहर विकास आघाडीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कोरोणाच्या संकटकाळात कष्टकरी गरीब उपाशी राहणार नाहीत यासाठी सर्वांनी त्यांना अन्नधान्याची मदत करा असे आवाहन केल्याने आज त्यांच्या हस्ते या परिसरातील ११०० गरजू लोकांना घरोघरी जावून ५ किलो गहू आटा,२ किलो तांदूळ,१ किलो साखर, अर्धा लिटर तेल, तिखट चहापत्ती आदी आवश्यक किराणा माल देण्यात आला. यावेळी नगरसेवक इब्राहिम बोहरी, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, लक्ष्मणभाऊ शिरसट,मुख्याधिकारी मानोरकर साहेब, श्रीराम तोंडसे, राहुल मोरे,गोविंद सर्वगोड, राजू मोरे, अंबादास वायदंडे,व सम्राट मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

