सौ.अश्विनी श्रीमंत भापकर (छावा क्षात्रवीर सेना महीला सचिव महाराष्ट्र राज्य) यांनी आशा स्वयंसेविका मागण्या पूर्ण करण्याबाबत मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ची ई-मेल नी संवाद साधला. प्रसिद्धी स दिलेल्या पत्रकात (ई-मेल) सौ.अश्विनी भापकर म्हणल्या,
मा.मुख्यमंत्री साहेब आज आपण पाहतोय कि कोरोनामुळे जगभर भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बऱ्याच विभागातील लोकांचे आपण विमे उतरवले पण आशा स्वयंसेविका जीवाशी उदार होऊन प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. तरीही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते आहे, आज कित्येक वर्षांपासून आशा तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत,ना कायम होण्याची हमी ना कोणत्या सरकारी लाभांची हमी.फक्त जीव धोक्यात घालून काम करायचे एवढेच आमच्या नशिबात आहे का ? आज आशा स्वयंसेविका म्हणजे आरोग्य विभागाचा पाया म्हणुन ओळखला जातो. पाया हा नेहमी भक्कम आधार देतो.पण कोणत्याही सरकारी धोरणात न बसल्यामुळे आशा स्वयंसेविका ढासळत चालल्या आहेत.आज गावातील लहान बाळापासून ते महाताऱ्या लोकांपर्यंतची इतंभूत माहिती गोळा करण्याचे काम को णत्याही आरोग्य विभागाच्या सुविधांचे काम आशा स्वयं सेविकांकडून करून घेण्यात येते पण पगार मात्र तुटपुंजा .आमच्याकडून खूप प्रमाणात काम करून घेतले जाते व मोबदला फारच कमी दिला जातो हा आमच्यावर होणार अन्यायच म्हणावा लागेल.यास आपणच योग्य तो न्याय मिळवून द्यावा.
म्हणुन आमची सर्व आशा स्वयंसेविकांच्या खालील मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात हि विनंती,
१. आशा स्वयंसेविकानांही सरकारी दर्जा देण्यात यावा.
२.सर्व आशा सेविकांना कायम स्वरूपी कार्यरत करावे
३.सरकारी विमा संरक्षण भेटावे
४.पगारामध्ये सरकारी योजनेप्रमाणे वाढ व्हावी
५.आशा सेविकांचा स्वतंत्र विभाग तयार करावा
मी आशा स्वयंसेविका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणुन आपल्याकडून अपेक्षा करते कि आपण आमच्या कार्याची दखल घेऊन लवकरच आमच्या मागण्या मान्य करून आम्हला योग्य तो न्याय मिळवून द्याल.
मा.उद्धव ठाकरे लवकरात लवकर आमच्या मागणी पूर्ण करतील असा आमचा विश्वास आहे. आम्ही साहेबांच्या निर्णयाची वाट पाहत आहोत असे ही त्यांनी या वेळेस सांगितलं.

