मुंबई , दि. २३ :- महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी आणि व्यापक असे प्रय़त्न करत आहे यात मुख्यमंत्री @uddhavthackeray यांनी सुरवातीपासूनच राज्यातील जनतेला समाज माध्यमावरून थेट संबोधित करण्याचे पाऊल उचलले. कोरोनाच्या अनुषंगाने थेट संपर्क टाळून आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून केलेला हा समाज माध्यमाचा वापर प्रभावी आणि उपयुक्त ठरला आहे.
विशेषतः थेट प्रसारणानंतर टिक-टॉक या सोशल अॅपद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांची भाषणे एक कोटी ७७ लाख जणांनी पाहिली आहेत. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अन्य भाषणांनाही सरासरी पन्नास लाखांहून अधिक जणांनी प्रतिसाद दिल्याची आकडेवारी आहे.

