पंढरपूर : दिवसेंदिवस जगावर कोरोनाचे संकट गहिरे होत चालले आहे.याचा मुकाबला करण्यासाठी शासनाच्या सोबतच विविध संघटना आपला खारीचा वाटा उचलत आहेत.याच कोरोनाच्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड१९ टेस्टिंग लॅब समिती स्थापन करण्यात आली असून डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन तथा पंढरपूरचे प्रसिद्ध उद्योजक अभिजीत पाटील यांची समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
उस्मानाबाद येथे प्रयोगशाळा, व संशोधन केंद्र स्थापन करून सर्व नागरिकांना कोरोनाची लक्षणे असू,किंवा नसू तरी या लॅब मध्ये कोरोनाची तपासणी करण्यात येणार असल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले. दररोज २०० लोकांचे तपासणी करण्यात येईल.यात डिव्हीपी उद्योग समूहाने खारीचा वाटा म्हणून कोरोनाची लक्षणे तपासणीची उपकरणे या लॅबला देण्याचे ठरले,असून लवकरच लॅब सुरू करण्यात येईल असे सांगितले
"कोरोनाचे संकट मोठे आहे.शासन आपल्या परीने यासाठी लढा देत आहे.परंतु हा लढा खुप मोठा असल्याने शासनाला काही बाबतीत अडचणी येत आहेत.यासाठी प्रत्येकजण शक्य तेवढी मदत करत आहे.आम्हीही डिव्हीपी उद्योग समूहाच्या माध्यमातून शक्य ती सर्व मदत करण्याचा व खारीचा वाटा उचलून कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न करत आहोत."
अभिजीत पाटील
चेअरमन डिव्हीपी उद्योग समूह

