पंढरपूर : शहराला लागूनच असलेल्या लक्ष्मी टाकळी गावातील उपनगरातील वृध्द महिलेल्या
सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यामुळे लक्ष्मी टाकळी येथील उपनगरात एकच खळबळ उडाली.पंढरपूर शहरापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या टाकळी उपनगरात ही घटना घडल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. अगोदरच कोरोनाच्या रोजच्या बातम्यामुळे नागरिकाच्या मनात भिती निर्माण झाली आहे. त्यातच उपनगरात एका वृध्देला सोलापूर येथे उपचारास नेल्यामुळे अनेक तर्क व संशय नागरिकांत वाढला आहे.
सध्याची परिस्थिती पहाता ग्रामपंचायत सरपंच सौ.नुतन रसाळे, सदस्य संदीप मांडवे, कारंडे यांनी प्रशासनाच्या मदतीने टाकळीस जोडले जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. या रस्त्यावर बाहेरून येणारी वाहतुक मोठ्या प्रमाणात होत होती त्यामुळे सदर रस्ते बंद करून उपनगरातील लोकांच्या सोयीसाठीच हे रस्ते बंद केले असल्याचे सांगितले. नागरिकांनी ही प्रशासनास सहकार्य करावे. गेले तीन दिवस संपुर्ण लक्ष्मी टाकळी गाव व उपनगरांनी उत्स्फुर्तपणे बंद पाळला होता.
नुकताच या महिलेचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे. नागरिकांनी अफवावर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे तसेच नागरिकांनी विनाकारण फिरू नये, तोंडाला मास्क लावावा असे आवाहन केले आहे.





