३० एप्रिल पर्यंत हा लॉकडाऊन राहील, शाळा आणि विद्यापीठांच्या परीक्षा, उद्योगधंद्यांच काय या सगळ्यांची उत्तरे १४ तारखेपर्यंत देणार

0
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोरोना विषाणू संदर्भात महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढील मुद्दे मांडले:
1. आज माननीय पंतप्रधानांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. या कॉन्फरन्समध्ये पंतप्रधानांसह मी व काही राज्याचे मुख्यमंत्री मास्क बांधून होते. आजपर्यंत कोणी आमच्या तोंडावर पट्ट्या लावण्याची हिंमत केली नाही,पण एका विषाणूने आमच्या तोंडावर पट्ट्या बांधल्या गेल्या
2. तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो. हे युद्ध आपण जिंकून दाखवणारच या निश्चयाने हे युद्ध लढायचं आहे.
3. "१४ नंतर ३० एप्रिल पर्यंत हा लॉकडाऊन राहील पण १४ नंतर साधारणतः काय करणार याच्या सूचना मग शाळा आणि विद्यापीठांच्या परीक्षा, उद्योगधंद्यांच काय होणार याची सगळ्यांची उत्तरे मी आपल्याला १४ तारखेपर्यंत देणार आहे."
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)