याचा गांभिर्याने विचार करून मा.पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे श्री.विक्रम दाते यांची तांत्रिक मदत घेऊन. पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये निर्जंतुकीकरण सुविधा पुरवणारे सॅनिटीझर टनेल आणि हँड वॉश पॉईंट ची उभारणी केली गेली आहे. जेणे करून पोलीस कर्मचाऱ्याना एक सं:रक्षक कवच मिळेल. अशी माहिती मा.श्री.सागर कवाडे (D.Y.S.P) यांनी पत्रकाराशी बोलताना दिली.
पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये निर्जंतुकीकरण सुविधा पुरवणारे सॅनिटीझर टनेल कार्यरत
एप्रिल ११, २०२०
0
पंढरपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस दल हे सदैव कार्यरत आहे. यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीसांचे आरोग्य सुरक्षित रहावे, तसेच कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाचे संक्रमण होऊ नये याकरिता सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे निर्जुंतुकीकरण करणे अत्यावश्यक आहे.
Tags

