बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवून वैचारिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचं श्रेय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना आहे. त्यांचे सत्यशोधक विचारच महाराष्ट्राला पुढे घेऊन जातील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्तानं उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना अभिवादन केलं असून राज्यातील जनतेला सत्यशोधक विचार पुढे घेऊन जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यावरील कोरोनाचं संकट लक्षात घेऊन सर्वांनी आपापल्या घरात थांबूनच क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या विचारांचं, कार्याचं स्मरण करावं. जयंतीचे जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत व कुणीही घराबाहेर पडू नये, घरातंच रहा, सुरक्षित रहा, असं ट्विटर वर ट्विट करता जनतेला आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

