या वेळी बोलताना माधवानंद आकळे म्हणाले की,संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे त्यामुळे हाजापूर गावात १०० टक्के लॉकडाऊनचे पालन केले जात आहे.कोरोना व्हायरसचा संसर्ग गावात होऊ नये म्हणून लोकं घराबाहेर जात नाहीत. त्या कारणाने रोजगार नाही.गावात जवळपास १०० ते १५० कुटुंबे रोजंदारीचे काम करुन उदरनिर्वाह करतात, मात्र गेल्या १५ दिवसापासून रोजगार नाही.त्यामुळे लोकांच्या दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून,लोकांची ही अडचण लक्षात घेऊन शासनाच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली गरीब कुटुंबांना शुक्रवार दि.१०/०४/२०२० रोजी अन्नधान्याचे व आवश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. तसेच समाजातील विविध दानशूर व्यक्तींनी आपल्या परीने गरजूंना शक्य तेवढी मदत करावी असे आवाहन ही आकळे यांनी केले.या प्रसंगी हजापूरचे तलाठी श्री. शेख साहेब,युटोपियन शुगर्स चे सी.एफ.ओ.दिनेश खांडेकर,स्टोअर किपर गणपत फाळके,चीफ अकौंटंट मुकेश रोडगे,वि.का.सेवा सोसायटी चे चेअरमन श्रीकांत गवंड,शाबु आबा करांडे,पिंटू काका देवकते,राजेंद्र देवकुळे,राजेंद्र आकळे, तानाजी फटे,विजय खांडेकर,सिद्धेश्वर शिंदे,नवनाथ लुगडे,प्रल्हाद आकळे,शाम आकळे,कोंडीबा भिसे,औदुंबर खांडेकर,मनोहर जानकर,इलाही शेख,नजीर शेख,दिगंबर दुधाळ,मधुकर कुटे,दत्ता बिचुकले,अमोल मोरे,दत्ता थोरात,गोपाळ करचे,विकास लुगडे,विठ्ठल सलगर,अतुल गावडे,आदि उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरीब शेतमजूर यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.
एप्रिल ११, २०२०
0
Tags

