राज्यात लॉकडाऊनच्या काळात व्हॉट्सअँप, फेसबुक व इतर समाज माध्यमांवर अफवा पसरवण्याचे काम काहीजण करत आहेत. अशातऱ्हेने अफवा पसरवण्याचा किंवा सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी केला तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
आतापर्यंत अशाप्रकारचे एकूण १९७ गुन्हे दाखल करण्यात आले असून ३७ जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली तसेच सर्व नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे अशी विनंतीही त्यांनी केली.

