महाराष्ट्र : देशभरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता, बीसीसीआयने खबरदारीचा उपाय म्हणून २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. केंद्र सरकार लॉकडाउन संदर्भात नेमकं काय निर्णय घेतंय हे पाहून स्पर्धा कधी खेळवली जाईल याचा निर्णय घेण्यात येणार होता. मात्र मंगळवारी सकाळी १० वाजता पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण देशभरात लॉकाडउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आल्याचं जाहीर केलं. त्यामुळे यंदाच्या हंगामातली आयपीएल स्पर्धा अनिश्चीत काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती बीसीसीआयमधील सुत्रांनीदिली आहे. दरम्यानच्या काळात बीसीसीआय अधिक पर्यायांवर विचार करणार असून, परिस्थितीत सुधारणा न झाल्यास ही स्पर्धा थेट पुढच्या वर्षी खेळवली जाऊ शकते अशीही माहिती सूत्रांनी दिली.

