पंढरपूर : कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र शासनाच्या वतीने डाॅकडाऊन व
जिल्हा बंदी असल्याने या कालावधीत पंढरपूर शहर व परिसरात अडकून पडलेल्या
भाविक, नागरिक व मालगाडीचे ड्रायव्हर व गरजू व्यक्तींना काँग्रेस ओबीसी
विभाग पंढरपूर शहर आणि महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेच्या वतीने
गेल्या 19 दिवसांपासून शहराध्यक्ष मधुकर फलटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली
दररोज सकाळी व संध्याकाळी मसाला राईस, चहा वाटप करण्यात येत आहे.
सदरचा उपक्रम राबविण्यासाठी पंढरपूरातील व्यापारी नाना ठिगळे ,
प्रविण कोलवार, आप्पा गङम, अभिजीत कौलवार, बालाजी देशमाने , यशवंत चव्हाण,
निलेश आमरे मेंबर यांच्या सहकार्याने 26/3 ते 14/ 4 एवढे दिवस सुरूच आहे.
सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मधुकर फलटणकर यांनी
कॉंग्रेस ओबीसी विभाग पंढरपूर शहर व महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज
महासभेच्यां माध्यमातून शहरातील गरजू भविकांना जिल्हा बंदी मूळे आङकून
आसलेले व्यापारी भाविक मालगाडी चे ङ्राईवर व सर्व गरजू पर्यंत मसाला राइस
आणि चहा पूरवण्याचे उपक्रम राबविलेला आहे यामुळे त्यांचे नागरिक व भाविक
भक्तांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
मधुकर फलटणकर हे नेहमीच
ओबीसी
कॉंग्रेस व तेली समाज महासभेच्या माध्यमातून अडचणी त असलेल्या नागरिकांना व
गोर गरीब पंढरपूरकरांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असतात.
फलटणकर यांनी सतत अशाप्रकारे सामाजिक उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त
करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे.


