महर्षी वाल्मिकी संघाने होडीमध्ये केले महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

0
पंढरपूर (प्रतिनिधी):- आज दि. 14 एप्रिल 2020 रोजी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महर्षी वाल्मिकी संघाने अनोख्या पध्दतीने साजरी केली. चंद्रभागेच्या पात्रामध्ये होडीतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

कोरोना विषाणुच्या पार्श्‍वभुमीवर सध्या संपुर्ण देश लॉकडाऊन आहे. या कालावधीत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखणे हे आपले सर्वप्रथम कर्तव्य आहे, त्याकरिता आज महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोठी गर्दी न करता अभिवादन करुन ही जयंती साजरी होणं अपेक्षीत आहे, याकरिताच आम्ही ठराविक कार्यकर्त्यांनी चंद्रभागेच्या पात्रामध्ये एका होडीत बसुन भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन केले. अशी माहिती महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.


  महर्षी वाल्मिकी संघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या परिसरात सोशल डिस्टींग्शन्स बाबत जनजागृती करावी, प्रत्येकाने आपापल्या घरातच बसावे, लॉकडडाऊनच्या नियमाचे काटेकोरपणणे पालन करावे, असे आवाहन यावेळी गणेश अंकुशराव यांनी केले. यावेळी उत्तम परचंडे, सचिन अभंगराव, सुरज कांबळे, सचिन नेहतराव, सुरज नेहतराव, अप्पा करकमकर, वैभव माने, सुनील गोंधळे आदी उपस्थित होते.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)