बेरोजगारीवर मात होऊ शकते - विशाल नामदेव माने.

0
१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या देशावर अनेक संकटे आली. काही नैसर्गिक(भूकंप,महापुर, दुष्काळ) प्रत्येक संकटाला आपला भारत देश एकजुटीने सामोरे गेला,आणि मात केली. परतु मानवनिर्मित समस्या राष्ट्रासाठी घातक ठरत असतात. त्यापैकी एक समस्या म्हणजेच बेरोजगारी... बेरोजगारी ही एक जागतिक समस्या आहे. जगभरातील बरेच देश हे विकसित राष्ट्र म्हणून ओळखली जातात तरीही त्या राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकारी असलेली दिसते. बेरोजगारीचे सर्वात मोठं कारण म्हणजे औद्योगिक क्रांती,त्याचबरोबर वाढती लोकसंख्या होय. युवकां समोरच एक मोठी समस्या बेरोजगार आहे. प्रत्येक राष्ट्राचे भविष्य हे आजचा युवक पिढीवर आहे. युवक मित्रांनो बेरोजगारीवर मात होऊ शकते.... त्यासाठी आपण वाढते औद्योगिकरण, वाढती लोकसंख्या या गोष्टींकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्याच बरोबर प्रत्येक व्यवसायातील यांत्रिकीकरण (औद्योगीकरण) कमी केले पाहिजे. युवकांनी नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा स्वतः व्यवसायिक व्हा. स्वतः व्यवसायातून रोजगार निर्मिती करा. आज आपण पाहिले तर औद्योगिक क्रांतीमुळे जगभरात मोठ्या प्रमाणात युवक बेरोजगारी वाढत आहे. व्यवसाय करत असताना यांत्रिकीकरण न करता आपल्या युवक मित्रांसाठी रोजगार निर्मिती करा कोणताही व्यवसाय केल्यानंतर त्यामध्ये रोजगार उपलब्ध होतोच उदाहरणार्थ:-१. पाणी शुद्धीकरण विक्री, यामध्ये पाण्याचे जार घरपोच किंवा नियमित ठिकाणी पोहोचवण्यासाठी दोन लोकांसाठी रोजगार उपलब्ध होऊ शकतो.२. उपहारगृह ३.रोपवाटिका ४.टी स्टॉल ५.दूध प्रकल्प अशा प्रकारच्या अनेक लहान व्यवसायातून रोजगार उपलब्ध होतात. युवक मित्रांनो कष्ट करण्याची तयारी आणि त्यात सातत्य व दूरदृष्टी असेल तर नक्कीच व्यवसायात आपण भरारी घेऊ शकतो. बेरोजगारी मात करायची असेल तर आपण व्यवसाय उभा केला पाहिजे रोजगार निर्मिती झाली पाहिजे लोकसंख्या वाढ थांबली पाहिजे. आजचा युवक मित्रांनो व्यवसाय करायचा म्हटलं तर कमीपणा वाटतो एखाद्या कंपनीत बारा तास काम करून आठ ते दहा हजार मिळवण्यापेक्षा स्वतःची चहाचा स्टॉल अधिक चांगला व्यवसाय असू शकतो. व्यवसाय उभा करून आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो युवक मित्रांनो आपण कसलाही कमीपणा न बाळगता कसलाही व्यवसाय उभा करायला हवा. आपण युवक बेरोजगारी, गुन्हेगारी, बेकारी,लोकसंख्या वाढ थांबू शकतो. एक विकसित,सुरक्षित सुशिक्षित राष्ट्र निर्माण होईल.

विशाल नामदेव माने.
९५४५४३४२९२
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)