गोरगरिबांच्या मदतीला सरसावले कर्मयोगी विद्यानिकेतन स्कूल

0
अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करताना रजिस्ट्रार गणेश वाळके, शाळेच्या प्राचार्या सौ.शैला कर्णेकरशिक्षक व शिक्षकेतर स्टाफ.
पंढरपूर : कोरोना महामारीमुळे देशभरात सर्वत्र लॉकडाऊन केल्याने गावागावात फिरणारे भटक्या समाजावर व कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. पंढरपूर येथे गरीब परिवाराना व कामगार वर्गाला सामाजिक बांधिलकी जोपासत कर्मयोग विद्यनिकेतन यांनी अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले.
लॉकडाऊनमुळे सर्वाधिक फटका हातावर रोजीरोटी करणाऱ्या लोकांवर बसला आहे. संकटाकलीन परिस्थितीत मदतीचा हात देवून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. पंढरपुर शहरातील कर्मयोगी विद्यानिकेतन स्कूल(सेमी इंग्लिंश) येथील प्राचार्या, रजिस्ट्रार, शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ यांनी आपल्या पगारातील काही रक्‍कम परप्रांतिय व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात देऊन सहकार्य केले. दि.०९ एप्रिल २०२०
सकाळी ११ वाजता आ.प्रशांत परिचारक यांचे ह्स्ते कामगार वर्गाला जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.
         यामध्ये तांदूळ, साखर, तूरडाळ, गोडतेल, गहु-आटा, चहा-पावडर, काळे-तिखट, मोहरी, कांदा, बटाटा, कोथिंबीर आदि साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेच्या प्राचार्या सौ.शैला कर्णेकर, रजिस्ट्रार गणेश वाळके, शिक्षक व
शिक्षकेतर स्टाफ उपस्थित होता.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)