पंढरपूर शहरातील प्रभाग क्र.५ व ६ मध्ये ३५० कुटूंबियांना भाजीपाला घरपोच !

0
पंढरपूर,प्रतिनिधी : सध्या जगभरात कोरोनाची साथ सुरू आहे. त्यामुळे सध्या भारतात लॉकडाऊन आहे.व संचारबंदी काळात नागरीक भाजीपाला खरेदी साठी गर्दी करतात त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याने आमदार प्रशांत परिचारक यांचे संकल्पनेतून जेष्ठ पत्रकार, समाजसेवक सत्यविजय मोहोळकर यांनी सुमारे ३५० कुटूंबियांना आठ दिवस पुरेल इतका भाजीपाला घरपोच केला.

   पहाटे लवकर मार्केट यार्ड मध्ये एक टेंमो भरून भाजीपाला खरेदी केला.  त्याचे वेगवेगळे 8 दिवस पुरेल असे किट करण्यात आले. या किटमध्ये कोबी, गाजर, भोपळा, शेवगा शेंग, काकडी, कारले, मिरची, टोमॅटो, वांगे, कोथिंबीर याचा समावेश होता. एकूण 350 किट 350 कुटुंबाला घरपोच सकाळी ८ वाजता देण्यात आले. यामध्ये उमदे गल्ली परिसर, संभाजी चौक, तानाजी चौक, पांडुरंग भवन परिसर, विजापूर गल्ली, जयभवानी चौक, विणे गल्ली, एकविरा देवी मंदिर,जुनी परीट गल्ली येथे घरोघर जाऊन वाटप करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांतून कौतुक करण्यात आले.या उपक्रमात रवी दिवटे, तुकाराम खंदाडे, धनंजय घोडके,बापू मोहोळकर, वैभव  येवनकर,सुमित घोडके, पंकज गुरमे, शैलेश घोडके, किरण दिवटे, माधव चोबे, प्रसाद जवंजाळ, सौरभ घोडके, पप्पू दिंडोरे,प्रविण घोडके यांनी परिश्रम घेतले. 
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)