पंढरपूर : वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. पंढरपूर नगरपालिका पंढरपूर त़र्फे भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेते यांच्या साठी आदेश काढला आहे या मध्ये आता भाजीपाला आणि फळ विक्री ही फक्त सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यन्त करता येईल. या वेळी व्यतिरिक्त जर कोणी भाजीपाला किंवा फळ विक्री करताना दिसल्यास त्यावर पंढरपूर नगर पालिकेच्या त़र्फे कारवाई करण्यात येईल अशी माहिती पंढरपूर नगरपालिका मुख्यधिकारी श्री.अभिजीत मानोरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
तसेच भाजी व फळ विक्रेत्यांनी गजानन महाराज चौक,भादुले चौक येथे गर्दी करू नये. शहर परिसरात किंवा उपनगरातील भागात फिरून भाजी किंवा फळे विकावी. भाजी व फळे विक्रेत्यानी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. तसेच हँड सॅनिटीझर सोबत असावा. या गोष्टी चे उल्लंघन होऊ नये याची काळजी भाजी व फळ विक्रते यांनी घ्यावी. नियमाचे उल्लंघन केल्यास पंढरपूर नगर पालिकेच्या द्वारे कारवाई केली जाईल. तरी या नियमाचे पालन भाजी आणि फळ विक्रेते यांनी करावे असे आवाहन पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी केले

