पंढरपूरात आंबेडकर पुतळा येथे नाकाबंदी करण्यात आली या मध्ये 150 वाहने मोटार वाहन कायदा 207 अन्वये पोलीस स्टेशन ला जप्त करण्यात आलेली आहेत. जप्त केलेली सर्व वाहने न्यायालयत सादर केली जातील व त्या नंतरच योग्य ती कारवाई करून ती नागरीकांना ताब्यात मिळतील अशी माहिती डी.वाय.एस.पी श्री.सागर कवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
वैद्यकिय कारणासाठी बाहेर पडत असणार्या नागरिकांना दवाखान्यात पोहचवण्याची सोय ही पोलीस प्रशासनाकडून करण्यात आल्याचे सांगीतले. काही नागरीक अत्यावश्यक पासचा दुरूपयोग करून इतर नागरिकांच्या गाडी मध्ये इंधन भरून देतात असे दिसून आल्याचे सांगीतले त्यामुळे वाहनांना पेट्रोल देताना ज्या नागरिकाला पास दिला गेला आहे. तो त्याच्याच गाडीत पेट्रोल भरतोय का या गोष्टींची खातरजमा केल्यानंतरच इंधन देत आहोत हे ही श्री.सागर कवडे यांनी नमुद केले.


