कायद्यासमोर कोणाचीच गय नाही - पालकमंत्री जितेंद्र आव्हाड

0
पंढरपूर : कोरोना विषाणूला रोखण्यात सोलापूर जिल्हा पहिल्या टप्प्यात यशस्वी झाला आहे. त्यामुळे उर्वरित अर्थात येत्या 14 एप्रिलपर्यंत लोकांनी काळजी घ्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
         सोलापूर दौर्‍यावरून मुंबई येथे परतल्यानंतर पालकमंत्री आव्हाड यांनी दुसर्‍या दिवशी रविवारी एक व्हिडीओ प्रसारित करून सोलापूरकरांना आवाहन केले.
जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि शासनाच्या वतीने सातत्याने करण्यात आलेल्या सूचना आणि आदेशाचे पालन केल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यात यश मिळालेले आहे. मात्र, काही लोक प्रशासनाचा आणि शासनाचा आदेश डावलून खुलेआम रस्त्याने फिरत आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव पोलिसांना अशा लोकांवर कारवाई करण्याची वेळ येत आहे. याचे वाईट वाटत असल्याची खंत पालकमंत्र्यांनी व्यक्‍त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी उर्वरित लढाई लढण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
        सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आटोक्यात आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात अद्याप एकही रुग्ण आढळून आला नसला तरी आतापर्यंत जिल्ह्यातील 490 लोकांना होम क्‍वांरटाईन करण्यात होते. त्यापैकी 370 व्यक्‍तींचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. अद्यापही 120 व्यक्‍तींना होम क्‍वांरटाईन करण्यात आले आहेत. त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.
कायद्यासमोर कोणाचीच गय नाही : आव्हाड
सोलापूर जिल्ह्यात पंढरीचा पांडुरंग आणि सिद्धेेश्‍वर महाराजांच्या कृपेने अद्याप कोरोनाचा एकही बाधित रुग्ण आढळलेला नाही. नागरिकांनी आणखी काही दिवस प्रशासनाला सहकार्य करावे. काही मंडळी कारण नसताना रस्त्यावर खुलेआम फिरत आहेत. त्यांच्या फिरण्याने इतरांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाईलाजास्तव एसपी, सीपी, पालिका आणि जिल्हाधिकार्‍यांना संबंधितांवर कारवाई करा म्हणून सांगण्याची वेळ आली. त्यामुळे हजार वाहने जप्‍त करण्यात आली याचे वाईट वाटते. त्यामुळे लोकांनी सहकार्य करावे, अन्यथा कायद्याचा बडगा वापरावा लागेल, असा इशारा पालकमंत्री आव्हाड यांनी दिला.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)