मतदान ओळखपत्र व आधार कार्ड पाहून धान्य देण्यात यावे - श्री.संभाजी शिंदे (शिवसेना जिल्हा प्रमुख)

0
पंढरपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अतिशय तळमळीने उपाययोजना करताना दिसून येत असून त्याच बरोबर सर्वसामान्य कष्टकरी जनतेची लोकडाऊनच्या काळात उपासमार होऊ नये त्यांना जीवनावश्य्क बाबीचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी कठोर उपयायोजना करीत आहेत.त्यांच्या आदेशानुसार राज्यभरात शिवसैनिक सामान्य लोकांच्या अडीअडचणी जाणून घेत असताना शासनाकडून स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून वितरित करण्यात येणाऱ्या धान्यापासून केवळ रेशनकार्ड नाही अथवा आहे हे रेशन कार्ड ऑनलाईन झालेले नाही, थम्ब झालेले नाहीत या कारणास्तव त्यांना धान्यपासून वंचित राहावे लागत आहे. हि गंभीर बाब लक्षात आल्याने शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी रेशनकार्ड नसलेल्याना व ऑनलाईन नोंदणी नसलेल्या कार्डधारकांना स्वस्त धान्य उपलब्ध करण्यात यावी  अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ईमेलद्वारे निवदेन पाठवून केली आहे. 
        या बाबत अधिक माहिती देताना शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे म्हणाले कि, रेशनकार्ड पासून वंचित राहिलेले बहुतांश लोक हे उदरनिर्वाह करण्यासाठी स्थलांतरित झाले होते.त्यामुळे ज्यांच्याकडे रेशनकार्ड आहेत त्यांचीही ऑनलाईन नोंदणी झालेली नव्हती.हे लोक आता कोरोनामुळे आपला रोजगार गमावून गावाकडे परतले आहेत त्यांना स्वस्त धान्य दुकानाकडून धान्य मिळणे गरजेचे आहे.अनेक नागरिकांकडे रेशन कार्ड नाही अशा लोकांना तो ज्या गावचा रहिवाशी आहे तेथील मतदान ओळखपत्र व आधार कार्ड पाहून धान्य देण्यात यावे   अशी आमची मागणी आहे.या निवेदनाच्या प्रत प्रांताधिकारी पंढरपूर सचिन ढोले  यांना देण्यात आली आहे. 
    यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव, शहर प्रमुख रवींद्र  मुळे,उपशहर प्रमुख विनय वनारे आदी उपस्थित होते. 
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)