कोरोना संशयित रुग्ण शोधण्याचे काम करणारे शिक्षक व इतर कर्मचार्‍यांनाही 50 लाखाचे सानुग्रह अनुदान द्यावे - शिक्षक आ. दत्तात्रय सावंत

0
पंढरपूर : घरोघरी जाऊन कोरोना संशयित रुग्ण शोधण्याचे काम करणारे शिक्षक व इतर कर्मचार्‍यांनाही 50 लाखाचे सानुग्रह अनुदान देण्यात यावे अशी मागणी शिक्षक आ. दत्तात्रय सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अर्थंमंत्री अजित पवार व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली. कोरोना विषाणूचे जगावर संकट आलेले
आहे, आपला देश आपले राज्यही यामध्ये नुकसान सोसत आहे आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत आहे. त्यामध्ये डायरेक्ट कोरोनाशी दोन हात करणारे आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना केंद्र सरकारने व पोलिस कर्मचार्‍यांना राज्य सरकारने 50 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर
केले, त्याप्रमाणे कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सर्व्हे करणार्‍या शिक्षकांना
50 लाखाचे सानुग्रह अनुदान द्यावे अशी विनंती आ.दत्तात्रय सावंत यांनी शासनानकडे केली आहे.
       चार-पाच दिवसांपासून शिक्षकांना प्रत्येक घरी जाऊन कोरोनाचा संशय रुग्ण शोधण्यासाठी प्रशासकीय आदेश दिले आहेत. राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी नेहमीच अग्रभागी राहिलेले शिक्षक कर्मचारी हे कार्य करीत आहेत. तसेच गरीब गरजू व्यक्तींना अन्नधान्य घरपोच करण्याचे कामही शिक्षक करीत आहेत. यामध्ये जोखीम पत्करून कार्य करणार्‍या शिक्षकांना व इतर विभागातीलकर्मचार्‍यांनाही 50 लाखाचे सानुग्रह अनुदान जाहीर करणे गरजेचे आहे व समान न्याय तत्वाचे आहे तरी यावर शासन निर्णय घेईल असा विेशास आ
सावंत यांनी व्यक्त केला.
        तसेच 14 एप्रिल पर्यत लॉकडाऊन असले तरी पुढील काही दिवस काळजी घेणे आवश्यक असल्याने कोरोना विषाणूचा नायनाट होई पर्यत प्रत्येक व्यक्तीने मास्क व सॅनिटायझर चा वापर केला पाहिजे प्रसंगी शासनाने तशी सक्ती करावी अशी ही मागणी पत्राव्दारे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्या कडे केले असल्याची माहिती आ दत्तात्रय सावंत यांनी दिली.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)