पंढरपूर : राज्यात सध्या जीवघेण्या कोरोना या आजाराच्या विरोधात राज्य सरकार / पोलीस बांधव / डॉक्टर नर्सेस यांनी जो लढा उभा केलाआहे त्याच युद्ध पातळीवर एक छोटा खारीचा वाटा मदत म्हणून अन्नपूर्णा कोल्ड्रिंक्स चे व्यवस्थापक सागर कलमे व कामले कुटुंबियांच्या वतीने आज 1 लाखाचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आज पंढरपूर शहराचे प्रांताधिकारी सचिनजी ढोले साहेब यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला येणार्या काळात लवकरात लवकर या रोगाचा नायनाट होवो हीच श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना करून सर्व नागरिकांना सुरक्षित राहा , आपल्या व आपल्या कुटूंबाची काळजी घ्या व प्राशसनास सहकार्य करा असे अव्हाहन सागर कमले यांच्या कडून करण्यात आले. यावेळी अतुल लिमकर , सुहास गुराडे , सुरज पेंडाल , गणेश चौधरी, सुरज गंगथडे,सागर घोडके, विनायक लटके ,नागेश थिटे , सचिन साळुंके , अक्षय नवत्रे आदी उपस्थित होते


