सफाई कामगार व गरजू नागरिकांना धान्याचे वाटप.

0
पंढरपूर : भीमशक्ती मंडळ व  संतोष सर्वगोड मित्र मंडळाच्या वतीने पंढरपूर येथील सफाई कामगार तसेच गरजू नागरिकांना काही अंतरावर बसवून धान्याचे वाटप युवक नेते प्रणव परिचारक, नगरसेवक सुजितकुमार सर्वगोड, माजी नगरसेवक आंबादास वायदंडे, भीमशक्ती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष सर्वगोड यांच्या हस्ते करण्यात आले.  
राज्यात कोरोना संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. याला रोखण्यासाठी देशाचा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिक बेरोजगार झाला आहे. तसेच सफाई कामगारांना आपला जीव धोक्यात घालून कमी वेतनात स्वच्छता करावी लागत आहे. या नागरिकांना भीमशक्ती मंडळ व संतोष सर्वगोड मित्र मंडळाच्या यांच्या वतीने पंढरपूर नगर परिषद संतपेठ विभागातील
सफाई कामगारांना व गरजू नागरिकांना काही अंतरावर बसवून गौतम विद्यालय येथे  धान्य वाटप करण्यात आले. यावेळी राहुल मोरे,युवक नेते उमेश सर्वगोड,गुरु दोडिया,संजय आडगळे,आनिल वाघमारे,दत्ता चंदनशिवे, रवि सर्वगोड,नवनाथ गायकवाड,लखन लामखाने ,रुषिकेश भोरकडे आदिंसह भीमशक्ती मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)