लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडचणीत सापडलेल्या जनतेच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय... प्रणव परिचारक

0
पंढरपूर : पंढरपूर  तालुक्यातील तीन रस्ता, कराड रोड येथील नागरिकांशी स्वतः जाऊन युवा नेते मा.प्रणव परिचारक भेट घेत यांनी  जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. तेथे कोरोना व्हायरसची माहिती देत घ्यावयाची प्रतिबंधात्मक काळजी समजावून सांगत लोकांच्या अडचणी समजावून घेत मी तुमच्या बरोबर असल्याचे सांगत धीर दिला. 
           गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना स्वतः मा.प्रणव परिचारक  भेट देत नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या जनतेच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याबाबत उपाययोजना करीत आहेत. 
घरात रहा, सुरक्षित रहा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कौशल्याने कोरोना परिस्थिती हाताळत आहेत. या संकटाचा सामना करताना सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. घरी थांबून, गर्दी टाळून आपण कोरोनाला हद्दपार करू शकतो. सरकार सर्व बाबीवर लक्ष ठेवून आहे. घरात रहा, सुरक्षित रहा, असे आवाहन मा.प्रणव परिचारक यांनी ग्रामस्थांना केले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)