पंढरपुरात कमलीवाले कुटुंबीयांकडून गरजूंना मदतीचा हात

0
पंढरपूर : संचारबंदी काळात पंढरपूर मध्ये गरजू नागरिकांना सुरू असलेल्या मदत कार्यात, कमलेवाली कुटुंब प्रथमपासूनच अग्रेसर आहे.माहिती मिळेल त्याठिकाणी पोहोचून गरजू नागरिकांना मदत करण्याचे काम हे कुटुंब पार पडत आहे .यामुळे पंढरी नगरीत या कुटुंबाचे नागरिकाकडून कौतुक होत आहे. 
       सध्या जगभर कोरोना  संसर्गजन्य रोगाचा फैलाव सुरू आहे. हा फैलाव होऊ नये म्हणून ,संचारबंदी आहे लागू करण्यात आली आहे. याकाळात अनेक गोरगरिबांचे हाल होत आहेत. पंढरपूर येथील कमलीवाले व त्यांच्या कुटुंबीयांनी पंढरपूरमधील गोरगरिबांना या काळात मदतीचा हात दिला आहे. या कुटुंबाकडून दैनंदिन जीवनोपयोगी वस्तूंचे गोरगरिबांना वाटप करण्यात आले आहे.
सध्याची परिस्थिती नाजूक असल्याने प्रशासनाला काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक , शेतकरी, कामगार, रोज हातावर पोट घेऊन जगणारे लोक यांचे हाल होत आहेत. त्यावर महाराष्ट्र सरकार व प्रशासन हे नक्कीच मार्ग काढत आहे, परंतु ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजाचे आपणहीे काही देणे लागतो ,या भावनेतून मुजम्मील कमलीवाले व त्यांचे वडील हा. खलील कमलीवाले यांच्या वतीने गरजु लोकांना १ महिना पुरेल इतके अन्नधान्य (गहु, तांदुळ, तुर दाळ, तेल) व जीवनाश्यक वस्तुची मदत केली जात आहे. या मदतीमुळे संकटकाळी नागरीकांना आधार मिळत आहे. मुजम्मील कमलीवाले यांचा मेडीकल व्यवसाय आहे या परिस्थितीत स्वतः जीव धोक्यात घालुन हे कुटुंब  मदत कार्य करत आहे. पोलीस बंधूंना कापडी मास्क व हात धुण्यासाठी हॅन्डवाॅश तसेच खिचडी वाटप या कुटुंबाने केले आहे. हातावर पोट असणाऱ्या तसेच निराधार लोकांना खिचडी वाटपही करण्यात आले आहे. येथील ६५ एकर परिसरामध्ये बाहेरगावातून आलेल्या, होम कॉरंटाईन असलेल्या ४० लोकांना तसेच १५ लहान मुलांना  जेवण आणि नाष्टा पोहे, कलिगंड, खरबुज या पदार्थांचे वाटप करण्यात आले आहे.
       राॅबिनहुड आर्मीतील लोकांना आणि सुमारे १०० पत्रकार बंधुना कापडी मास्क देण्यात आले. या सर्व कामामुळे कमलीवाले कुटुंबाचे पंढरी नगरीतील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
         पंढरीत दररोज होणाऱ्या मदत कार्यात कमलीवाले कुटुंबातील हा.खलील कमलीवाले, डाॅ.के.एम.साहेब, रिजवान बेदरेकर,सरताज भडाळे यांचा समावेश आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)