पंढरपूर : पंढरपूरातील उद्योगपती अभिजीत पाटील यांनी नेहमीच सामाजीक कार्यात मदत केली आहे. प्रत्येक वेळी त्यांनी ग्रुपच्या माध्यमातून सर्वाच्या पुढे एक पाऊल टाकत मुख्यमंत्री निधीस 1 लाख रूपयेचा सहाय्यता निधी प्रांताधिकारी ढोले साहेब यांचेकडे दिला आहे. यावेळी मुख्याधिकारी अभिजीत मानोरकर होते.
लॉकडाऊन झाल्यापासून डीव्ही ग्रुपचे अभिजीत पाटील यांनी अनेकांना मदत केली आहे. अगदी एका हाताने दिले दान दुसर्या हाताला कळू न देता त्यांनी अनेकांना मदत केली आहे. सामाजीक काम करताना त्यांनी प्रसिध्दी कमी व काम जादा केले आहे.सध्या त्यांनी पोलीस,नर्स,डॉक्टर, महसुल कर्मचारी, आणि पत्रकार यांचेसाठी सकाळी नास्ता, दुपारी अन सायंकाळी जेवणाच्या पार्सलची सोय केली आहे. या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
कोरोनामुळे आज डॉक्टर,नर्स,पोलीस,प्रशासन,सर्व स्तरावर आपले घरदार सोडून जीवाची पर्वा न करता लढत आहेत. आपले मुख्यमंत्री सेनापती सारखे लढत आहेत. अशा वेळी आर्थिक मदतीची गरज असते. मी मदत म्हणून निधी न देता माझे कर्तव्य म्हणून मी मुख्यमंत्री सहाय्यता निधी दिला आहे. आपणही फुल ना फुलाची पाकळी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक मदत करावी.यावेळी बोलताना ते म्हणाले कोरोना सध्या वाढताना दिसत आहे त्यासाठी आपण प्रशासनाने सांगितलेल्या सुचना काटेकोर पाळाव्यात, तोंडाला मास्क लावावा. सोशल डिस्टंट ठेवावा. गरज असेल तर घरातून बाहेर पडून प्रशासनास मदत करावी.


