पंढरपूर : संपूर्ण देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलं आहे.पंढरपूर मध्ये बाहेरगावचे जवळ जवळ दोन हजार लोक लाॅकडाऊन मध्ये आडकलेले आहेत. आपल्या गावी जाण्यासाठी या लोकांना कोणता पर्याय उपलब्ध नाहीय.कारण संचारबंदी मुळे कोणतेही वाहन उपलब्ध नाहीय.या लोकांनंसाठी शासनाच्या वतीने मा.प्रांताधिकारी श्री.ढोले साहेब यांनी नाश्ता व जेवणाची सोय केलेली आहे.
आपल्या देश बांधवाची सोय आपणच केली पाहिजे असे आवाहन मा.ढोले साहेब यांनी केले होते. या आवाहनास प्रतिसाद म्हणून तसेच सामाजिक बांधिलकी व माणुसकी या नात्याने केंदे महाराज येथे आमच्या मित्र परिवाराच्या वतीने मठात किराणा सामान पोच केले.
या वेळी मा.श्री.ढोले साहेब, श्री.संदीप तापडिया सर, श्री.अमर देशमुख, श्री.अमोल अटकळे ,श्री.बबलूशेठ मर्दा ,श्री.सुनिल राठी श्री.शितल खाबाणी, डाॅ श्री. सागर गडम,श्री.नागेश मुचलंबे आदी उपस्थित होते.

