पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी व अधिकारी यांचे थर्मल स्क्रीनिंग (covid-19) व तपासणी

0
पंढरपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारतर्फे विविध उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत. पंढरपूर नगरपालिका द्वारे ही अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.पण या उपाययोजना करताना नगरपालिका कर्मचारी व अधिकारी यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.नगरपालिकेच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांला कोरोना ची बाधा होता कामा नये याची काळजी पंढरपूर नगरपालिका प्रशासना कडून घेतली जात असल्याचे दिसत आहे.
      पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी व अधिकारी  यांचे थर्मल स्क्रिनिंग मुख्यवैधकिय अधिकारी डॉ.बी.के.धोत्रे यांनी केले. 
यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले मुख्यआधिकारी अनिकेत मनोरकर पक्षनेते गुरुदास अभ्यंकर आरोग्य सभापती  विवेक परदेशी  उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर यांचे उपस्थितीत करण्यात आले यावेळी हिवताप अधिकारी किरण मंजुळ ,पाणी पुरवठा अभियंता आत्माराम जाधव ,डी एफ गजाकोश हजर होते.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)