प्रभाग क्रमांक ४ मध्ये १५०० गरजू कुटूंबांना १५ दिवसाचे जीवनावश्यक धान्य वाटप - नगरसेवक विक्रम शिरसट (बांधकाम समितीचे सभापती,नगरपालिका पंढरपूर)

0
पंढरपूर : कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. उद्योगधंदे बंद आहेत त्यामुळे रोजगार नसल्याने गरिबांची उपासमार होत आहे. या साठी पंढरपूर येथे प्रभाग क्रमांक ४ मध्ये १५०० गरजू  कुटूंबांना प्रभागाचे नगरसेवक नगर परिषद बांधकाम समितीचे सभापती विक्रम शिरसट यांचे वतीने १५ दिवसाचे जीवनावश्यक धान्य वाटप आमदार प्रशांतराव परिचारक यांचे हस्ते करण्यात आले.
          येथील व्यासनारायण झोपडपटटी, रामबाग परिसर, अंबाबाई झोपडपट्टी या प्रभाग ४ मधील मोलमजूरी, कष्टकरी अशा गरजू कुटुंबांना महापूर, कोरोनाच्या महामारीचे संकट असो नेहमी मदतीचा हात पुढे करणारे माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट व त्यांचे कर्तव्यदक्ष नगरसेवक विक्रम शिरसट यांनी स्वखर्चातून प्रभागातील गरजू १५०० कुंटूबांना धान्यवाटप करण्याचे नियोजन केले आहे आज व्यास नारायण परिसरातील कुटुंबांना धान्य देण्यात आले, आमदार प्रशांतराव परिचारक यांनी शहरातील आघाडीचे नगरसेवक आपपल्या प्रभागात गरजूंना मदत करावी असे आवाहन केले व त्याला विक्रम शिरसट व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी भरघोस मदत केल्याबद्दल धन्यवाद दिले कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष बाबासाहेब अधटराव, शिवसेना नेते साईनाथभाऊ अभंगराव, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, भारत माने, अनिकेत शिरसट,विक्रांत दशरथ माने,आदी मान्यवर उपस्थित होते
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)