राज्यात काल रात्री पर्यंत 522 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 8590 अशी झाली आहे. यापैकी 1282 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
तसेच राज्यात कोरोनासाठी त्रिस्तरीय उपचार व निगा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सध्या तीन वर्गवारीतील १६७७ उपचार केंद्र असून त्यामध्ये १ लाख ७६ हजार ३४७ विलगीकरण (आयसोलेशन) खाटांची संख्या आहे तर ७२४८ अतिदक्षता (आयसीयू) खाटांची उपलब्धता आहे. सुमारे तीन हजार व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत. ८० हजाराच्या आसपास पीपीई किटस तर २ लाख ८२ हजार एन ९५ मास्क उपलब्ध आहेत, अशा प्रकारे कोरोना उपचाराची सज्जता करण्यात आली आहे.

