पंढरपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने घरातच लोक अडकलेले आहेत. गेल्या काही दिवसापासून लोकांच्या हाताला काम नाही. अशात तळहातावर कमावून खाणारे कसेबसे जेवणाची सोय करीत आहेत. परंतु ज्यांचे कुणीच नाही अशा निराधार वृद्धाांना,अपंग,बेघर लोकांना विश्वक्रांती सामाजिक संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक व उपाध्यक्ष युवक कॉग्रेस (आय) (पंढरपूर मंगळवेढा विधानसभा) श्री.सोमनाथ आरे (शेटफळकर) यांचेकडून मदतीचा एक हात म्हणून,पंढरपूर येथील गरजूंना चपाती,,भाजी,चटणी,भात आणि पाणी बाटली चे वाटप करण्यात आले. तसेच पंढरपूरातील सफाई कामगार,पोलीस प्रशासनातील सर्व कर्मचारी यांना शिरा व पाणी बाटली वाटप करण्यात आले.
तसेच लॉकडाऊन असल्या कारणामुळे अनेक भटकी कुत्र्याचे ही जेवनाचे हाल होत आहेत ही बाब श्री.सोमनाथ आरे (शेटफळकर) यांच्या लक्षात आल्याने अशा भटक्या कुत्र्याना पेडीग्री देण्यात आले. त्याच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.






