आरोग्य सेतु अँप नागरीकांच्या हिताचा :-आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी

0

पंढरपूर : आपल्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतीसाद देत आहे व १३ दिवसात ५ कोटी हुन जास्त लोकांनी आरोग्य सेतु अँप डॉउनलोड केला. चिन, साउत कोरिया , सिंगापूर या देशातील व प्रशासनाला अशा अँपच्या माध्यमातून कोवीड १९ पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यासाठी खुप मोलाची मदत झाली, या मुळे तेथील परिस्थिती आटोक्यात येण्यास मदत झाली. हा अँप अँड्रॉइड मोबाईल मध्ये प्ले स्टोअर मध्ये व अॅपल मोबाईल मध्ये आरोग्य सेतू नावाने उपलब्ध आहे किंवा खाली दिलेल्या लिंक च्या मदतीने सदर अँप डॉउनलोड करता येतो. या अँप चे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या देशातील विविध ११ भाषा मध्ये या अँप वर माहीती भरता येते, मिळवता येते. सुरवातीला ओटीपी नंबर  वेरीफाय करुन नंतर जिपीयस व ब्युटुत ची परमिशन देऊन या अॅप च्या प्रमुख कार्याला सुरुवात होते. या अँप मध्ये आपणास आपल्या मागील महिन्यातची प्रवास हिस्ट्री व साधी सोपी प्रश्र्न विचारली जातात, सर्व  माहिती खरोखर भरायची आहे व शेवटी आपण किती रिक्स मध्ये आहोत, सुरक्षित आहोत यांची माहिती रिझल्ट रूपाने दिली जाते. आपण सुरक्षीत आहोत किंवा आपणास सेल्फ क्यारंटाईन मध्ये रहायला पाहिजे असे विविध रिझल्ट मिळतात.            

           घरा बाहेर पडताना आपल्या मोबाईलाचे जिपीयस, ब्लूटूथ ऑन ठेवणे गरजेचे आहे. आपण कोठेही फिरत असताना आपल्या संपर्कात कोण कोण आले व आपण कोणा कोणाच्या संपर्कात होतो याची माहिती या अँप मध्ये स्टोअर राहते. जर कोरोना बाधीत व्यक्तींच्या संपर्कात आपण आल्यास आपणास मोलाईल वर मेसेज येतो. जर समजा आज आपण एका व्यक्तीच्या संपर्कात आलो व पुढे काही दिवसा नंतर कळाले हा व्यक्ती कोवीड १९ पॉझिटिव्ह आहे. तर आपणास लगेच या अँप च्या मदतीने माहीती मिळते व मेसेज येतो. सदर व्यक्ती मागील दिवसा मध्ये कोणा कोणाच्या संपर्कात होता, त्या सर्व लोकांना या संदर्भात मेसेज जातो व शासकीय यंत्रणेलाही गाईड लाईन मिळतात व शासन आपल्या सुरक्षेसाठी उपाययोजना करते, हाच सर्वात महत्त्वाचा फायदा या अँपचा आहे. 
             या अँपचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शासनाच्या कोरोना संदर्भातील नवनवीन सुचना, अपडेट आपणास मिळतात, कोवीड १९ चे आपल्या पुर्ण देशाचा करेक्ट तपशील , माहीत आपणास कळते. सर्व राज्यातील हेल्पलाईन नंबर या अँप माध्यमातून आपणास मिळतात. आपण प्रवास करत असताना ज्या ठिकाणाहून आपण जात आहे त्या भागात कोरोनाचा हॉटस्पॉट झोन असेल तर आपणास दुसऱ्या रत्याने जाण्याची सुचना या अँपच्या माध्यमातून मिळते. याचा आपणास उपयोग होतो.
     या अँप च्या माध्यमातून आपणास कोवीड १९ पासुन यशस्वी पणे लढता येईल, घर बसल्या प्रशासनाला मदत  करता येईल. जास्तीत जास्त लोकांनी हे अँप इंस्टॉल करून, माहिती भरुन प्रशासनाला मदत करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्यक्तीने ४० नागरिकांच्या मोबाईल मध्ये हे अँप ईस्टाल करुन, नागरिकांची माहिती भरावी असे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्या नंतर २४ तासात १ कोटी १० लाख लोकांनी सदर अँप डॉउनलोड केले. आपले आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही हे अँप डॉउनलोड करा असे आवाहन केले. मि आरोग्य समिती सभापती, नगरपरिषद पंढरपुरच्या वतीने आपणास आवाहन करतो की भारत सरकारने कोरोना विरुद्धची लढाई सोपी होण्यासाठी आरोग्य सेतू अॅप तयार केला असून आपण आपल्या , आपल्या मित्र परिवारांच्या, सर्व नागरिकांच्या मोबाईल मध्ये अँप डॉउनलोड करुन शासनाला मदत करावी ही नम्र विनंती.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)