कोरोनापासून देशाची मुक्तता होवो यासाठी प्रार्थना व फलाहार वाटप

0
कोरोनाच्या प्रसारामुळे सध्या देशभरात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे.त्यामुळे हातावरले पोट असलेल्या अनेक गोरगरीब कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.कोरोना  विषाणू मुळे बाधित होणाऱ्यांची संख्या वाढत आहे.या देशाला कोरोना पासून वाचव अशी प्रार्थना आज कॉग्रेस प्रणित ब्राम्हण सेलच्या वतीने विठ्ठल उपासना बडवे मंदिर येथे करण्यात आली.
   या प्रार्थनेनंतर पंढरीत कोरोनामुळे अडकून पडलेल्या  आश्रितांना व अंध अपंग वृद्धाना फलाहार वाटप करण्यात आले अशी माहिती कॉग्रेस प्रणित ब्राम्हण सेलचे जिल्हाध्यक्ष दत्त्तात्रय बडवे यांनी दिली.दत्तात्रय बडवे यांनी नुकतीच मुख्यमंत्री निधिसाठी ३१ हजार रुपये इतकी रक्कम आपल्या पेन्शन मधून देणार असल्याचेही जाहीर केले आहे.     

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)