कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता पंढरपूर शहारातील सर्व दुकाने तीन दिवसात बंद

0

पंढरपूर : संपुर्ण जगात व देशात कोरोना व्हायरस या रोगाने थैमान घातले असुन नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सोलापूर शहर येथील वाढते कोरोना सदृष रुग्ण पाहता पंढरपूर शहरातील सर्व नागरीकांनी कळविण्यात येते की, कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्याकरिता बुधवार दि.२२ एप्रिल २०२०, गुरुवार दि.२३ एप्रिल २०२०, व शुक्रवार दि.२४ एप्रिल २०२० हे तीन दिवस पंढरपूर शहरातील सर्व दुकाने (मेडिकल व हॉस्पिटल सोडुन) बंद राहतीलया तीन दिवसात अत्यावश्यक सेवेतील दुध विक्री सेवा सकाळी ७ ते ९ या वेळेतच सुरु राहतील.  मडिकल व हॉस्पिटल सोडुन इतर सर्व दुकाने, फळे व भाजीपाला विक्री देखील या दिवशी बंद राहतील.

          तरी पंढरपूर शहरातील सर्व व्यावसायिकांनी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आपली दुकाने बंद ठेवावीत व हे तीन दिवस कोणत्याही नागरीकांनी घराबाहेर पडु नये असे आवाहन नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकरउपनगराध्यक्ष अनिल अभंगरावगटनेते गुरुदास अभ्यंकरविरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे, सर्व सभापती नगरसेवक व  नगरसेविका यांनी केले आहे.   

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)