कोरोनाच्या पार्शवभूमीवर पंढरपूर नगर पालिकेने पाणीपट्टी करवाढ मागे घ्यावीतीन महिन्याची पाणीपट्टी माफ करा

0
पंढरपूर : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.याचा फार मोठा फटका पंढरपूर शहरातील नागिरकांना सहन करावा लागत आहे.पंढरपूर शहराचे अर्थकारण हे पूर्णतः यात्रेवर अवलंबून आहे.चैत्री यात्रा रद्द झाल्यामुळे शहरातील अनेक छोट्या मोठ्या व्यवसायिकांना फार मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.तर आगामी आषाढी यात्रेवरही कोरोनाचे फार मोठे संकट घोंगावत आहे.अशा वेळी शहरातील प्रामाणिक करदात्या नागिरकांना दिलासा देण्यासाठी नगर पालिकेने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात केलेली पाणीपट्टी वाढ त्वरित मागे घेण्यात यावी व एप्रिल,मे,जून या कालावधीची पाणीपट्टी पूर्णतः माफ करावी अशी मागणी कॉग्रेस प्रणित ब्राम्हण सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय बडवे यांनी केली आहे. 
     या बरोबरच पाटबंधारे विभागानेही पंढरपूर शहरातील परिस्थिती लक्षात घेऊन पंढरपूर नगर पालिकेची तीन महिने कालावधीची पाणीपट्टी माफ करावी अशी मागणी दत्तात्रय बडवे यांनी केली आहे.शासनाने गेल्या काही दिवसात केंद्र व राज्य सरकारने अनेक सवलती दिल्या आहेत तरी यात्रेच्या अर्थकारणावर अवलंबून असलेल्या पंढरपूर शहरातील नागिरकांना शासनाने दिलासा द्यावा अशी मागणी दत्तात्रय बडवे केली आहे.याबाबतच्या निवेदनाच्या  प्रति राज्याचे मुख्यमंत्री,नगरविकास मंत्री,पाटबंधारे मंत्री यांना पाठविण्यात आल्या आहेत.    

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)