पंढरपूर ( प्रतिनिधी ) : पुणे, सातारा, सांगली. कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील अद्याप पगार सुरू झाला नसलेल्या विना अनुदानित शाळेतील आर्थिक विवंचनेत असलेल्या शिक्षकांना जीवनावश्यक वस्तूचे किट तयार करून आ. दत्तात्रय सावंत यांनी शिक्षक संघटनेच्या
आपल्या कार्यकर्ता मार्फत घरपोच करीत मदतीचा हात दिला आहे
महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी
व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आ. सावंत यांनी दि. १३ एप्रिल रोजी संवाद साधला. त्यावेळी व लॉकडाऊन वाढविल्याने दि. १४ व १७ एप्रिल या दोन दिवसांत तात्काळ ज्यांना पगार नाही व ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. अशा शिक्षकांना लॉकडाऊन उठे पर्यंत पुरेल एवढा किराणा माल घरपोच करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पुणे विभागातील ५८ तालुक्यातील गरजू शिक्षकांना जीवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप करण्यात आले.
आ. दत्तात्रय सावंत यांनी शाळा कृती समितीच्या प्रत्येक स्थानिक
तालुका पदाधिकाऱ्यांशी संपर्क प्रदेश सचिव, शाळा कृती समिती पाठवून गरजु विना अनुदानित शिक्षकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच करण्यासाठी केला. त्यामुळेच दोन दिवसांत असंख्य विनाअनुदानित शिक्षकांना किराणा माल घरपोच करण्यात आला.

