पंढरपूर : महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळख असणार्या पंढरपूर लॉक डाऊनच्या काळात आता महत्त्वाच्या ठिकाणी व गर्दी होण्याची शक्यता असणार्या ठिकाणी प्रथमच ड्रोन कॅमेराद्वारे पाहणी करण्यात येत असून नियम तोडणार्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.
सध्या कोरोना मुळे सर्वत्र लॉक डाऊन आहे. सर्व बंद आहे, अत्यावश्यक सेवा सोडून सर्व ठप्प आहे , कोणालाही विनाकारण शहरात संचार करायला बंदी आहे, असे असतानाही काही लोक नियम तोडून फिरत असतात, अशांवर यापूर्वीही अनेकदा नजर ठेवण्यात येऊन कारवाई करण्यात आली आहे,नाकेबंदी करून पोलीस प्रशासनाने आत्ता पर्यन्त 750 पेक्षा जास्त वाहने जप्त केली आहेत. मात्र नजर चुकवून असे काही लोक फिरत असतातच, उगाच काहीतरी बोगस कारण सांगून इकडून तिकडे फिरत असतात किंवा किराणा दूध भाजीपाला, मेडीकल घेण्यासाठी अशा दुकानात सोशल डिस्टेंस न पाळता गर्दी करतात, विनाकारण कोणतीही दक्षता न घेता व नियम न पाळता गर्दी करत असतात, अनेकदा पोलीस आहे, तोपर्यंत सर्व नियम पाळले जातात, परंतु पोलीस व्हॅन निघून जाताच परत जैसे थी परिस्थिती तेथे होत असते, यावर आता नियंत्रण मिळवण्यासाठी पंढरपूर पोलिसांनी श्री.सागर कवडे (D.Y.S.P ) यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर व ग्रामीण भागात ड्रोन कॅमेरा द्वारे पाहणी करण्यात येणार आहे.

