अत्यावश्‍यक आणि मूलभूत सेवा सुरळीत राहाव्यात या साठी संचार बंदी तुन वेगळ्या जातील या सेवा जिल्हाधिकारी शंभरकर

0
        सोलापूर : लॉकडाउनच्या कालावधीत अत्यावश्‍यक आणि मूलभूत सेवा सुरळीत राहाव्यात यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश जारी केले आहेत. यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाची कामे, वीजवितरण, दूरध्वनी सेवा, पाणी पुरवठा, जलनिस्सारण आणि स्वच्छतेबाबतची आनुषंगिक कामे सुरू राहणार आहेत. संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्‍यक मूलभूत सेवा देणाऱ्या विभागांना सेवा संचालनामध्ये अडचणी निर्माण होत असल्याचे संबंधित विभागांनी कळविले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी शंभरकर यांनी हे आदेश काढले आहेत.
         या आदेशानुसार आता राष्ट्रीय, राज्य महामार्गाची कामे, दुरुस्ती करणे, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि इतर विद्युत विषयक विभागाकडील पोल उभारणे, देखभाल दुरुस्ती कामे सुरू राहतील.पाणी पुरवठा, जल निस्सारण आणि स्वच्छता ही कामे सुरू राहतील. भारत संचार निगम लिमिटेड आणि खासगी दूरसंचार कंपनीकडे दूरसंचार आणि इंटरनेट सेवा दुरुस्तीची कामे सुरू राहतील. ही कामे सुरू राहण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेडच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी लेखी आदेश द्यावेत, असे नमूद करण्यात आले आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)