सुरक्षित अंतर ठेवत अगदी मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत चैत्री एकादशीची नगरप्रदक्षिणा केली जाणार आहे.

0
पंढरपूर : सुमारे 400 वर्षांची परंपरा असलेल्या चैत्री यात्रेला यंदा कोरोना संकटामुळे वारकरी भाविक पंढरीला येऊ शकलेले नाहीत. दरवर्षी यात्राकाळात वारकऱ्यांच्या गर्दीमुळे पंढरीत येणारा भक्तीचा महापूर यंदा पाहायला मिळत नाही. मात्र, लाखो वारकऱ्यांच्या वतीने स्थानिक फडकरी, मठाधिपती आणि महाराज मंडळींनी शासनाच्या नियमांचे पालन करत आपापल्या मठातून पंढरीनाथाची सेवा परंपरेप्रमाणे सुरू ठेवली आहे. सुरक्षित अंतर ठेवत अगदी मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत चैत्री एकादशीची नगरप्रदक्षिणा केली जाणार आहे.
कोरोनाचे संकट दूर झाल्यावर सर्वांनी पंढरीत यावे अशी आव्हान संत तुकाराम महाराजांचे वंशज चैतन्य महाराज देहूकर म्हणाले, याचा धरीन अभिमान करिन आपुले जतन, या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे चैत्री वारी सर्व वारकऱ्यांच्या वतीने आम्ही पंढरपूरमधील महाराज मंडळी, फडकरी, दिंडी मालक, मठाधिपती असे सर्वजण मिळून पार पाडत आहोत. कोरोनाचे संकट दूर झाल्यावर सर्वांनी पंढरीत यावे. आपण सर्वजण मिळून पंढरीनाथाची आराधना करू, नामसंकीर्तन करू.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)