पंढरपूर नगरपालिके मार्फत शहर व उपनगरात निर्जंतुकीकरण मोहीम

0
पंढरपूर : लॉकडाउन झालेपासून दररोज पंढरपूर शहर व उपनगरात जंतूनाशकाची फवारणी चालू आहे.दुकाने,मॉल,दवाखाने इ.चे दरवाजे व सर्व परिसर निर्जंतुकिकरणाचे काम हातपंपा द्वारे चालू आहे. या साठी नगरपालिकेने वॉर्डचे विभाग करून काम करत आहे. 
   टी सी एल पावडर वापरून हे निर्जंतुकीकरन केले जात आहे. हिवताप पर्यवेक्षक श्री.किरण श्रीराम मंजुळे व डी.एफ.गजाकोष यांनी दिली.
       हे काम ठेकेदारा मार्फत रोजंदारी कामगार करत आहेत टाकळी रोड, इसबावी, बिडारी बंगला,देवकते मळा, माऊली नगर,हनुमान नगर, सोलापूरे नगर, श्रीराम नगर, हरिनयन पार्क व उपनगरात या सर्व भागात होत आहे.
       पंढरपूर यात्रे वेळी व हिवताप, डेंगू इ.साठी ही फवारणी केली जात असते. अशी माहिती श्री.सचिन शिंदे यांनी दिली आहे. तसेच सचिन शिंदे, अशोक सर्वगोड, सौरभ सर्वगोड, माने इ. लोक या कामात कार्यरत आहेत.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)