सोलापुरातील आयसोलेशन वार्डात 669 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 504 जणांचे अहवाल प्राप्त झाला असून यापैकी 409 व्यक्तींचा निगेटिव्ह आला आहे. तर 14 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी नव्याने एक रूग्णांची भर पडली आहे. सदर रूग्ण पाच्छा पेठ येथील असून त्याच्यावर सिव्हील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहे.
 सोलापुरात आतापर्यंत 14 कोरोना रूग्ण असून, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 13 जणांवर सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. सोलापुरात आणखी एक कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.  
नागारिकांनो, घरातच रहा
सोलापूर शहर-जिल्ह्यातील नागाfरकांनो घरामध्ये रहा. गरज पडल्यावरच बाहेर पडा.  विनाकारण गर्दी टाळा. नागरिंकांनी वेळोवेळी आपले हात स्वच्छ धुवावे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा. कोरोनाचा प्रादु&भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिकेच्या आरोग्य यंत्रणा सहकार्य करावे.
-मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी

 
  