सोलापूर : कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. राज्यात ही कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत प्रत्येक दिवस वाढ होत आहे. सोलापूर  जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एकही कोरोना बाधित रुग्ण नव्हता. सोलापूर जिल्हा हा ग्रीन झोन मध्ये होता, परंतु काही दिवसा पूर्वी ग्रीन झोन मध्ये असलेला सोलापूर जिल्हा आता मात्र रेड झोन मध्ये गेला असल्याचं दिसून येत आहे.
        सोलापूरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा १५ वर जाऊन पोहचला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
          सोलापुरात दिवसेंदिवस कोरोनाची संख्या वाढतच आहे. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यात आजच एक महिला पॉझिटिव्ह निघालेली असून तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.त्या महिलेच्या संपर्कातील लोकांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे.
         आज प्राप्त अहवालांमध्ये नव्याने 01 रुग्ण महिला  पॉझीटीव्ह आढळली  असून तिचा  उपचार घेत असताना मृत्यू झाला असून सदर महिला ही भारत रत्न इंदिरा नगर परिसरातील असून तिच्या संपर्कातील ०८ जणांना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहे. भारत रत्न इंदिरा नगर परिसराला कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले असून सदर भाग सील करण्यात आला आहे. सदर भागात मनपा मार्फत सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे.
सोलापूर कोरोना अपडेट 
कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण संख्या  : 15
मृत : 02
उपचार सुरू असलेले : 13

 
  