सोलापुरात 102 कोरोना पॉझिटिव्ह पेशंट : पालकमंत्री दत्तात्रय भरणे

0
सोलापुरात 102 पेशंट पॉझिटिव्ह असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. आजपर्यंत सहा बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे हेही त्यांनी सांगितले. आजच्या आढावा बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. तीन पेशंटना आज निगेटिव्ह रिपोर्ट आल्याने डिस्चार्ज दिला असल्याचंही त्यांनी सांगितलं.
काल सोलापूर मध्ये 81 बाधित रुग्ण असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली होती. मात्र आज एकाच दिवसात 21 रुग्णांची भर पडली आहे. हे पालकमंत्र्यांच्या बोलण्यावरून दिसून येत आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)